उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाचे भरीव सहकार्य.

*उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाचे भरीव सहकार्य.*
*लांजा तालुक्यातील पूल व रस्ते यासाठी १० कोटींचा निधी मंजूर!!!*

मिलिंद बेर्डे./ लांजा मागील अनेक वर्षांपासून लांजा तालुक्यात पायाभूत सुविधांच्या विकसनासाठी सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या उल्का विश्वासराव यांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या कामांना राज्य शासनाने प्राधान्यक्रम देऊन आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भरघोस निधीची उपलब्धता करून दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यांचा भूभाग मोठ्या प्रमाणात डोंगराळ असल्याने या भागात दळणवळणाच्या अत्यंत मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अशाप्रकारे अडीअडचणी नागरिकांना भेडसावत असणे दुर्दैवी गोष्ट आहे. यासाठी शासनाकडे विकासकामांची यादी घेऊन नियोजनबद्ध रीतीने उल्का विश्वासराव यांनी पाठपुरावा केला. यामध्ये *शिपोशी हरिहरेश्वर मंदिर येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५ कोटी *रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ***प्रभानवल्ली खोरनिनको महालक्ष्मी ये*थे पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी रुपये ‘*अर्थसंकल्प २०२३’* मधून प्राप्त झाले आहेत. याशिवाय *भांबेड कोलेवाडी मौजे मांजरे गावडी घाटाच्या बांधकामासाठी १ कोटी रूपयांचा निधी* उपलब्ध झाला आहे.
यावेळी आपला आनंद व्यक्त करताना उल्का विश्वासराव म्हणाल्या, “मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी म्हणतात की हे जनतेच्या मनातलं सरकार आहे. जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेलं आमच सरकार जनतेला समर्पित आहे. आज या समर्पणाच्या भावनेची प्रचीती आली. अत्यंत कमी कालावधीत जनतेच्या समस्यांचा विचार करून मा. अर्थमंत्र्यांनी आज लांजा तालुक्यासाठी १० कोटींहून अधिक रक्कम या अर्थसंकल्पातून दिली आहे. मा. बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेबांनी अत्यंत योग्य मार्गदर्शन केल्याने कामांना मंजुरी मिळून निधीही उपलब्ध झाला. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आमदार मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमीच नैतिक पाठबळ दिल्याने आज महासंकल्पातून लांजा तालुक्यासाठी भरीव निधी प्राप्त करण्यात आम्हाला यश प्राप्त झाले. यासाठी मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.”

IPRoyal Pawns