अभिनेता विराट मडकेचा हटके लूक
‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ केसरी या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अभिनेता विराट मडके एका वेगळ्या रावडी लूकमध्ये दिसून येत आहे. आत्तापर्यंत विराटने साकारलेल्या भूमिकेपेक्षा एकदम विरोधाभास असणारी भूमिका आणि त्याप्रमाणे त्यातला हा त्याचा लूक दिसून येत आहे.
हातात बंदूक आणि डेंजर लूक असं विराटचं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं आहे. या भूमिकेबद्दल विराट सांगतो, ‘’हा सिनेमा माझ्यासाठी चॅलेंजिंग होता. मानसिकदृष्ट्या आणि शारीरकदृष्ट्याही हा सिनेमा करणं आव्हान होतं. या भूमिकेसाठी मी वेगळा अभ्यास केला. चॅलेंजिंग लोकेशन्स आणि एक्शन सीन्स यामुळे हा सिनेमा करताना मजा आली. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना ही भूमिका नक्की आवडेल.’’
हा सिनेमा मराठी – कन्नड भाषेत शूट झाला असून सदागरा राघवेंद्र यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.