अंधेरी पश्चिम येथील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटला आग
मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात
तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे.
घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत.
सिनेमाच्या सेटमधील बहुतांश सामान
ज्वलनशील असल्याने आग वेगानं पसरली
आहे. आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला
असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले आहेत, किती जणांची सुटका करण्यात आली आहे, ही माहिती समोर आलेली नाही. मात्र आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. फिल्म शूटिंगच्या स्टुडिओ असल्यामुळे आग वेगाने पसरली. या आगीमध्ये संपूर्ण फिल्म शूटिंगचे स्टुडिओ जळून खाक झाले आहे.
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटाच्या सेटला आग प्राथमिक माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट ‘लव रंजन’चा सेट उभारण्यात आला होता. सेट वर लाईटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. त्याला आग लागलेली नाही. चित्रपटाचे नाव निश्चित
नसून काही दिवसापूर्वी त्याचे शुटिंग पॅरिसला
झाले. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्येने कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे
































