करणच्या पार्टीत पुन्हा करोना…..
बॉलीवुडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने २५ मे रोजी आपला ५० वा वाढदिवस मुंबई येथील ‘यशराज फिल्म्स स्टुडिओमधे’ साजरा केला. यावेळेस जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या पार्टीचे बरेच फोटो टाकले गेले होते व ते चर्चेतही राहिले. मात्र ही पार्टी अनेक कलाकारांच्या जीवनात कोरोना घेऊन आल्याचे निदर्शनात येत आहे.
कारण आता पर्यंत अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि शाहरुख खान यांना संसर्ग झाला आहे, ते सर्वजण या वाढदिवसाच्या
सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते.
देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना
कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरची
बर्थडे पार्टी कोरोना स्प्रेडर असल्याचे म्हटले जात
आहे.
ही पार्टी करोनाचा हॉटस्पॉट ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानने ‘कोई मिल गया’ या गाण्यावर डान्स देखील केल्याचे सांगण्यात येत आहे.
करणच्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना करोनाची लागण झाल्याचे कळतेय. करणच्या या पार्टीत सलमान खान, कतरिना कैफ, शाहरूख खान, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि असंख्य बॉलीवुड कलाकारांबरोबरच टॉलीवुड कलाकारांचाही समावेश होता. या पार्टीतील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येतेय
अनेकांनी त्यांना करोना झाल्याची माहिती लपवली आहे तर कार्तिक आर्यनच्या करोनाची बातमी चांगलीच चर्चेत आहे. याआधी करणने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी पार्टीत उपस्थित सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. तेव्हा राजकीय नेत्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता. शेवटी करणला पोस्ट लिहून स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
आता पुन्हा करण च्या पार्टीत कोरोना शिरल्याचे समजल्यावर पार्टीतील इतर कलाकार काळजीत असल्याचे कळत आहे.
अश्या पार्ट्यां वर सरकार तर्फे पुन्हा बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.