यंदा लालबागचा राजा विराजमान होणार…

लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज रविवार रोजी विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते महत्वपूर्ण निर्णय घेत यंदा लालबागचा राजा विराजमान होणार असल्याचे सांगत शासन निर्णयानुसार आध्यात्मिक ऊर्जा व सामाजिक भान सर्व पावित्र्य राखत “माझा गणेशोत्सव माझी जबाबदारी” या संकल्पनेला अनुसरून “माझा राजा येतोय”.

आता तुम्हा सर्वाना एकच मनात गोष्ट सलत असेल की, याच वर्षी का गेल्या वर्षी का नाही…..

तर गेल्यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव पाहता अन त्याच्या रौद्ररूप पाहता शासनाच्या विनंतिला मान देवून रक्तदान, प्लाझ्मा दान कुणीही जवळ यायला घाबरताना देखील कुठल्याही प्रसंगात शासनाला सहकार्य हे सामाजिक भान ठेवून “आरोग्य उत्सव” साजरा केला.
माझा राजा येतोय हा उत्साह लालबाग रहिवाश्यांना दिलासा देणारा आहे.
लालबागच्या राजाची मूर्ती ४ फुटाची असल्याचे समजतं आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns