*चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाची नावनोंदणी प्रक्रिया सुरू!*
*ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार.*
*मुंबई* – महाराष्ट्र शासनाच्या “चित्रपताका” पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली असून
https://evnts.info/chitrapatakafest2025
प्रेक्षकांना लिंकवर ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदवता येणार आहे तसेच पु .ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील नॉनो सभागृहात ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.
सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने “चित्रपताका” आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दिनांक २१ ते २४ एप्रिल २०२५ रोजी पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी,मुंबई येथे पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये प्रेक्षकांना ड्रामा, विनोदी,सामाजिक अशा विविध प्रकारचे ४१ आशयघन चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत. त्याचबरोबर सिने रसिकांसाठी पाच परिसंवाद, दोन मुलाखती आणि दोन कार्यशाळांचे आयोजन या महोत्सवांमध्ये करण्यात आले आहे