विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजा बाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली. या नंतर विधिमंडळाच्या आवारात विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड व गिरीश महाजन हे बोलत उभे होते त्याच वेळेस विधिमंडळाच्या आवारातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी विधिमंडळाच्या बाहेर जात होती, मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत होते त्यावेळेस या तिघांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली व त्यांच्याशी संवाद सुरू केला. तातडीने शिवसेनेचे सचिव व मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर गाडीतून उतरून मुख्यमंत्र्यांचे जवळ आले व हसतच म्हणाले “साहेब यांनी तुमची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आहे का? तेव्हा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले “आम्हाला गाडी अडवण्याची गरज नाही आम्ही केव्हाही येऊ शकतो”.
तेव्हा मिलिंद नार्वेकर हसतच म्हणाले “साहेब यांना आत्ताच गाडीत टाका व यांना शिवबंधन बांधायला घेऊन चला” त्याबरोबर तेथे हशा पिकला. लागलीच प्रवीण दरेकर म्हणाले” हे आमचे मूळ आहे आम्ही केव्हाही येऊ शकतो”.