पुन्हा लॉकडाऊन करायचा का? – मुख्यमंत्रांचा जनतेला सवाल

महाराष्ट्रात कोरोनाची अजून तरी दुसरी लाट आलेली नाही मात्र कोरोना दरवाजावर धडका देत आहे तो दरवाजा उघडायचा की नाही हे आपणच ठरवायला पाहिजे! ते कसे ठरवणार तर मी जबाबदार ही मोहीम राबवून ‘मी जबाबदार’ आपण आज पासून ही मोहीम राबवत आहोत आता मी जबाबदार म्हणजे काय? तर कोरोना वाढू द्यायचा की नाही याला आपणच जबाबदार असणार आहोत, म्हणजे काय तर
१. मास्क घालणे अत्यावश्यक
२. सतत काही वेळाने हाथ धुणे अथवा सॅनिटायझर ने साफ करणे.
३. एकमेकांच्यात सुरक्षित अंतर ठेवणे.
आपण हा त्रिसूत्री कार्यक्रम अंमलात आणलात तर कोरोना वाढणार नाही.
यापुढे आपल्याला काही नियम पाळावे लागतील जसे
• गर्दी करणाऱ्या आंदोलनांना काही दिवस बंदी असेल,
• गरज असल्यास कडक निर्बंध लादा अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश
• राजकीय धार्मिक सामाजिक कार्यक्रमांना काही दिवसांकरता बंदी.
• आता मास्क हीच आपली ढाल
• पक्ष वाढवूया पण करोना नको
• मास्क न वापरणाऱ्या वर कारवाई होणारच सर्वांनी करोनाचे नियम पाळणे गरजेचे
• मुख्यमंत्र्यांकडून मी जबाबदार मोहिमेची घोषणा
• शासकीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार
• आता पर्यंत राज्यात नऊ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे.
• ऑफिसच्या वेळेची विभागणी करा
• लॉकडाऊन नको असल्यास शिस्त पाळणे गरजेचे
• वर्क फ्रॉम होम वर भर द्या लॉकडाउन लावण्याबाबत आठ दिवसात निर्णय घेणार
• नियम मोडल्यास हॉल हॉटेल चालकांवर धडक कारवाई

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns