रवींद्र महाजनी यांचे निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह

रवींद्र महाजनी यांचे निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह

मराठी चित्रपटातील देखणा अभिनेता म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी ( ७७ ) यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील बंद खोलीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुबाबदार
व्यक्तीमत्त्वाच्या या मराठी सिनेसृष्टी गाजवणारा कलावंताची अखेर अशी व्हावी हे समझल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांचे मुंबईचा फौजदार, देऊळ बंद, पानीपत आदी चित्रपट विशेष गाजले होते.

तळेगाव दाभाडे येथे भाड्याच्या खोलीत काही महिन्यापासून रहात असलेले रवींद्र महाजनी यांच्या
सदनिकेतून वास येत असल्याची माहिती
रहिवाशांनी पोलिसांना दिली असता पोलिसांनी सदनिकेचा दरवाजा तोडला असता महाजनी यांचा मृत्यू 2 ते 3 दिवस आधीच झाल्याचे आढळले.
महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला असून पोलिसांनी ही माहिती दिल्यावर गश्मिर तातडीने तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले.

रवींद्र महाजनी यांना गेल्या काही दिवसांपासून दम्याचा त्रास जाणवत होता. मावळमधील वातावरण
मानवल्यामुळे ते गेल्या सात ते आठ महिन्यांपासून
मावळमध्ये राहायला आले होते. तळेगांव एमआयडीसी परिसरातील आंबी गावात असलेल्या एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ते भाड्याने राहत होते. फ्लॅटमध्ये ते एकटेच रहात होते. त्यांच्या फ्लॅटमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागल्याने सोसायटीतील नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी येऊन फ्लॅट
उघडण्याचा प्रयत्न केला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने अखेर फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले.

IPRoyal Pawns