भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.
मी देवेंद्र फडणवीसांवर नाराज, नाईलाजाने भाजपा सोडावं लागतंय, फडणविसांनी खोटे गुन्हे दाखल करायला लावले. भाजपामध्ये छळाला सीमा नव्हत्या अतिशय खालच्या पातळीचे राजकारण झालं माझ्यावर पाळत ठेवण्यात आली विनयभंगाचा खटला दाखल करणं हे सर्वात दुःख देणार होत. गेली चार वर्षे मानसिक तणावाखाली घालवली. सोबत कुठलाही आमदार-खासदार राष्ट्रवादीत येणार नाही. राष्ट्रवादीकडून कुठल्याही प्रकारचे आश्वासन मिळालेले नाही – एकनाथ खडसे
खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत.
खडसेंच्या राजीनामा ही धक्कादायक बाब, पक्षासाठी चिंतन करण्याची गोष्ट – सुधीर मुनगंटीवार
एकनाथ खडसे ही केवळ एक सुरुवात आहे त्यांच्या पाठोपाठ आणखी काही नेते येतील – राजीव सातव. खडसे यांचा निर्णय पक्षापेक्षा ही त्यांच्यासाठी दुर्दैवी त्यांची समजूत काढण्यात पक्ष कमी पडलेला नाही – रावसाहेब दानवे.
खडसे यांचा राजीनामा पोहोचला, खडसे पक्ष सोडणार नाहीत अशी आशा होती – चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षासाठी काम करत राहणार भाजपमध्ये राहूनच जनतेची सेवा करणार एकनाथ खडसेंच्या सून खासदार रक्षा खडसे.
आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले.
गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.
आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.