महाराष्ट्र पोलिसांनी ट्विटरवरून प्रियांका चोप्राला चक्क ‘या कृत्यासाठी तुम्हाला कलम ३९३ नुसार दंड आणि ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो’ असे समन्स धाडले आहे, यावर प्रियांकाने ‘उप्स! आम्ही रंगे हाथ पकडलो गेलो. आता प्लॅन बी अॅक्टीव्हेट करण्याची वेळ आली आहे’ असे उत्तर दिले.
नाही नाही चकित होऊ नका हा सगळा प्रकार मजेशीर आहे त्याचे असे झाले,
शोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे प्रियांका फरहानला ‘एकदा आयशा ठिक होऊ दे मग आपण दोघे मिळून बॅंक लुटूया’ असे सांगताना दिसत आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र पोलिसांनी या सीनचा स्क्रीनशॉट शेअर करत ‘या कृत्यासाठी तुम्हाला कलम ३९३ नुसार दंड आणि ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो’ असे ट्विट करत तिची फिरकी घेतली आहे.
प्रियांकाने सुध्दा आपली चूक मान्य करत महाराष्ट्र पोलिसांना मजेशीर उत्तर दिले आहे. ‘उप्स! आम्ही रंगे हाथ पकडलो गेलो. आता प्लॅन बी अॅक्टीव्हेट करण्याची वेळ आली आहे’