‘साऊथ ते मराठी’ रवी प्रकाश यांची खाकी वर्दीत दमदार एन्ट्री!

‘साऊथ ते मराठी’ रवी प्रकाश यांची खाकी वर्दीत दमदार एन्ट्री!

मराठी कलाकार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवित असताना, दाक्षिणात्य कलाकारांची सुद्धा मराठी चित्रपटात दमदार एन्ट्री होत आहे! प्रसिद्ध तेलगू अभिनेता रवी प्रकाश ‘दशमी’ या आगामी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, आपल्या पहिल्याच चित्रपटात ते डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, मराठीत पदार्पण करताना त्यांनी थेट खाकी वर्दीचा रुबाब दाखवत ‘एसीपी आसिफ मुजावर’ ही  रुबाबदार व्यक्तिरेखा साकारली आहे.  चित्रपटाचा दमदार पॉवरपॅक्ड असा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

IPRoyal Pawns