रंगभूमीवर रंगलंय ‘सुभेदार गेस्ट हाऊस’

रंगभूमीवर रंगलंय ‘सुभेदार गेस्ट हाऊस’

सस्पेन्स-थ्रिलर या पठडीत मोडणारे ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे मराठी नाटक सध्या रंगभूमीवर आले आहे. प्रख्यात लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘माऊस ट्रॅप’ या गाजलेल्या नाटकावर आधारित हे नाटक आहे. साहजिकच या नाटकाविषयी मोठे आकर्षण आहे. ‘माऊस ट्रॅप’ हे नाटक सन १९५२ पासून जागतिक रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकाचे मराठीकरण करत रंगभूमीवर आलेले ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ हे नाटक रसिकांच्या मोठ्या गर्दीत रंगत आहे. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ व ‘सुकल्प चित्र’ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाच्या निमित्ताने बऱ्याच काळाने ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ ही संस्था नव्याने नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात उतरली आहे.

सध्याचे आघाडीचे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख यांनी या नाटकात अभिनयाची बाजू जोरकसपणे सांभाळली आहे. ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून, नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे आणि नाटकाला अजित परब यांनी संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे प्रयोग सध्या मोठ्या उत्साहात रंगभूमीवर सुरु आहेत.

IPRoyal Pawns