चार्ली चॅप्लिन यांचा १३३ वा जन्मदिवस यानिमित्ताने “द क्लॅप”१६ एप्रिलला पुण्यात

चार्ली चॅप्लिन यांचा १३३ वा जन्मदिवस यानिमित्ताने “द क्लॅप”१६ एप्रिलला पुण्यात

जागतिक सिनेमातला एक अढळ तारा म्हणून चार्ली चॅप्लिन यांना आजही ओळखले जाते. चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एका नव्या युगाची, वास्तववादाची सुरुवात केली. चॅप्लिन यांनी स्वत:ची स्वंतत्र अभिनय शैली निर्माण केली. ज्यामुळे इतक्या वर्षांनंतर आजही चार्ली प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. १६ एप्रिल हा चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने ‘मिलाप -थिएटर टुगेदर’ ही संस्था ‘द क्लॅप’ हे चार्ली चॅप्लिन यांच्या जीवनावरील नाटकाचा प्रयोग पुण्यातील एरंडवणे येथील “द बेस” येथे १६ एप्रिल अणि १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.०० वाजता सादर करणार आहे. तसेच या प्रयोगाला “अस्तित्व” या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

करुणेचा विनोदकार चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या कंगोऱ्यांवर आजवर विविध भाषांमध्ये शेकडो पुस्तके लिहिली गेली आहेत. या सर्व पुस्तकांच्या पलिकडली चॅप्लिन यांची बाजू, त्यांच्या जीवनातील व्यक्ती, त्यांचे एकमेकांवर पडणारे प्रभाव आदी गोष्टी ‘द क्लॅप’ या नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘द क्लॅप’ या नाटकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चार्लीच्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्ससारखाच या नाटकालाही कृष्णधवल फील देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चार्लीचा आॅरा तयार करण्यासाठी तशा पद्धतीचे कॅास्च्युम्स आणि सेटसही डिझाईन करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न मराठी रंगभूमीवर प्रथमच करण्यात येत असल्यानं निश्चितच ‘द क्लॅप’च्या टिमचं कौतुक केलं जाणार आहे. डाॅ. निलेश माने, स्वप्नील पंडीत, नीरज कलढोणे यांनी ‘द क्लॅप’चं लेखन केलं आहे. तर वेशभूषा केली आहे श्रुतिका वसवे यांनी. या नाटकात पायल पांडे, सायली बांदकर, वर्धन कामत, सानिका पुणतांबेकर, राहुल मुदगल, या कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘मिलाप – थिएटर टुगेदर’ या संस्थेचे ‘द क्लॅप’ हे पहिलं नाटक आहे. या संस्थेमार्फत भविष्यात वैविध्यपूर्ण, संशोधनपूर्ण नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशी आशा ‘द क्लॅप’ नाटकाचे दृष्यसंकल्पकार प्रणव जोशी यांनी व्यक्त केली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns