स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाऊंडेशन तर्फे नाट्यसंगीत स्पर्धा

स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन आयोजित नाट्यसंगीत स्पर्धा, आठवण सुवर्ण काळाची !

स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाऊंडेशन तर्फे नाट्यसंगीत स्पर्धा

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये संगीत रंगभूमीचे मोठे योगदान राहिलेले आहे. याच संस्कृती वैभवाचा जागर करण्यासाठी सर्वांगीण सांगितिक अनुभव मानल्या जाणाऱ्या नाट्यसंगीत स्पर्धेचे स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाऊंडेशन तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील आगामी गायन प्रतिभेचा हा शोध म्हणजेच ही नाट्यसंगीत स्पर्धा होय.

स्पर्धा स्वरूप आणि नियमावली :

• स्पर्धा पूर्व प्राथमिक, प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा स्वरूपात आयोजित केली जाईल.

• स्पर्धक वयोगट १८ ते ५० वर्ष

• स्पर्धेसाठी मराठी संगीत नाटकातील नाट्यपद सादर करणे अपेक्षित आहे

पूर्व प्राथमिक फेरी

पूर्व प्राथमिक फेरीसाठी नाट्यपदाची mp3 फॉर्मेट मधील Audio Clip पाठवावी.

• Audio Clip स्पष्ट आवाजात कोणतेही अतिरिक्त इफेक्ट्स किंवा एडिटिंग न करता पाठवावी.

• सादरीकरणाचा कालावधी जास्तीत जास्त तीन मिनिटांचा असावा.

प्राथमिक फेरी

• पूर्व प्राथमिक फेरीतून परीक्षकांनी निवड केलेले २५ वर्धक प्राथमिक फेरीसाठी पात्र होतील

प्राथमिक फेरी शुक्रवार दिनांक २६ जून २०२६ रोजी दुपारी ठीक दोन वाजल्यापासून आयोजित केली जाईल

• नाट्यपदाच्या सादरीकरणाचा कालावधी जास्तीत जास्त पाच मिनिटे असावा.

• साथीदार वादकांची (ऑर्गन आणि तबला) सोय आयोजकांतर्फे केली जाईल.

• स्पर्धकांना स्वतःचे साथीदार बरोबर आणायची परवानगी आहे.

परंतु संवादिनी (हार्मोनियमचा) साथीकरिता वापरासाठी करण्यास परवानगी नाही, केवळ ऑर्गनच वापरायचा आहे याची कृपया नोंद घ्यावी.

• प्राथमिक फेरीत निवडलेले सात स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र होतील.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २० मे २०२६.

बालगंधर्व जयंती दिन आणि ‘मराठी आठव दिवस’ पूर्वसंध्या

स्थळ :

पु. ल. देशपांडे कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर मिनी सभागृह), प्रभादेवी, मुंबई

अंतिम फेरी नियमावली

• अंतिम फेरी शनिवार दिनांक २६ जून २०२६ रोजी रात्री ८ पासून सुरू होईल

• अंतिम फेरीसाठी पात्र स्पर्धकांनी ३ नाट्यपदांची तयारी ठेवायची आहे. आयत्या वेळेस

परीक्षक जे सुचवतील ते नाट्यपद सादर करावयाचे आहे

• सादरीकरण कालावधी जास्तीत जास्त ७ मिनिटे.

सर्व फेऱ्यांसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

स्पर्धेच्या आयोजनामध्ये कोणत्याही टप्प्यावर बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे

राखीव राहील.

• स्पर्धेसाठी उपस्थित राहण्यासाठी स्पर्धकांना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च, निवास

व्यवस्था किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

स्पर्धेसाठी प्रवेश फी रु १०००/-

बाजूचा QR Code स्कॅन करा आणि

गुगल फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करा.

(पूर्व प्राथमिक फेरीसाठी mp3 ऑडिओ क्लिप पाठवण्याची व्यवस्था ही गुगल फॉर्ममध्येच करण्यात आली आहे.)

कै. अरविंद पिळगावकर स्मृती

प्रथम पारितोषिक

रुपये २५,०००

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

 

कै. सीताराम गणपती मणेरकर स्मृती

द्वितीय पारितोषिक

रुपये १५,०००

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र

कै. सुनीला प्रदीप चित्रे स्मृती

तृतीय पारितोषिक

रुपये १०,०००

सन्मानचिन्ह. प्रमाणपत्र

 

उत्तेजनार्थ

(चार पारितोषिके)

रुपये ३,०००

प्रमाणपत्र

 

सौ. रजनी राणे

श्री. रजनीश राणे

(स्वामीराज प्रकाशन)

संयोजक

अमेय रानडे ९८९२३ ९१६८१

तपस्या नेवे ९०८२५८८५९९

आयोजक

सौ. शलाका कोरगावकर

श्री. भाऊ कोरगावकर

(पल्लवी फाउंडेशन)

IPRoyal Pawns