‘लालबत्ती’ अभिमानाची

२६/११ च्या भीषण अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला त्याचप्रमाणे असा हल्ला पुन्हा झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी एका प्रशिक्षित, नव्या दमाच्या, तरुण, सुदृढ आणि शस्त्रसज्ज पथकाची गरज भासू लागली याला उत्तर म्हणून Q.R.T. अर्थात शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. ठाणे शीघ्र कृती दला मध्ये घडलेल्या घटनेवर आधारित ‘लालबत्ती’ हा चित्रपट आधारित आहे. कथा…..ठाणे Q.R.T. चे प्रमुख एस. बी. पवार ( मंगेश देसाई ) कडक शिस्तीचा ऑफिसर त्यांचा दरारा पूर्ण कमांडो टीम वर होता मात्र त्याला अपवाद होता त्यातील एक कमांडो गणेश (तेजस सोनावडेकर), कमांडोना मोबाईल तसेच सोशल मिडियावर बोलण्याची बंदी होती तरीपण गणेश सतत मोबाईलवर असायचा व कोणात मिसळत नसे तसेच इतर कामांडोन कडून त्याच्या बद्दल तक्रारी येऊ लागल्या त्याच्या अश्या वागण्याने पवारांना त्याचा संशय यावयास लागला म्हणून पवारांनी गणेश प्रकरणाच्या मुळा पर्यंत जायचे ठरवले यात गणेश बद्दल पवारांना काय कळते? पवार व त्यांची टीम गणेशच्या आई वडलांचा शोध घेण्यात यशस्वी होतात का? गणेशची व त्याच्या आईची भेट होते का?या व अश्या प्रश्नांची उत्तरे मोठ्या पडद्यावर पहाणेच योग्य ठरेल. गिरीश मोहितेचें दिग्दर्शन चांगले झाले आहे मात्र अजून चांगले होण्यास वाव होता, तितकी अपेक्षा मोहितें कडून नक्कीच होती. चित्रपट बराचवेळ मध्ये मध्ये कंटाळवाणा झाला आहे. मंगेश देसाई या गुणी अभिनेत्याने चांगला अभिनय केला आहे. भार्गवी चिरमुले, तेजस, मनोज जोशी, विजय निकम उत्तम.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns