प्रेम, गोंधळ आणि गूढतेचा हलकाफुलका तडका ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’
‘बेटर-हाफची लव्हस्टोर’ ही कथा, सुबोध भावेच्या पात्राभोवती फिरणारी आहे, ज्याची पत्नी गेली असली, तरी तिचा वावर त्याला तरीही जाणवतोय.
या भासातून मुक्त होण्यासाठी तो करत असलेल्या प्रयत्नांमध्ये हास्य आणि रहस्याची भन्नाट मिसळ आहे. एकीकडे टीझरमध्ये हलकीफुलकी विनोदी झलक दिसते, तर शेवटी ऐकू येणारा एक गंभीर प्रश्न, ‘त्यादिवशी एक्साक्टली काय घडलं?’ प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची गुंफण तयार करतो. या रहस्याची उकल मात्र २२ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहातच होणार आहे.
सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.’ हा चित्रपट २२ ऑगस्टला सिनेमागृहात दाखल होणार आहे.





























