सिनेसृष्टीत रोमँटिक हिरो किंवा चॉकलेट बॉय म्हणून अनेक कलाकार प्रसिद्ध आहेत तुम्हाला देखील असंच काहीसं करायचं होतं का?
सिनेमात काम करण्याचं माझं स्वप्न होतं. त्यासाठी बरेच दिवस काम सुरु होतं. मनाला भावेल आणि प्रेक्षकांनाही आवडेल अशी कथा मला सिनेमाच्या निमित्ताने आणायची होती आणि त्यासाठी रोमँटिक फिल्म सारखा उत्तम पर्याय मला योग्य वाटला. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक ठरवतील हा नवीन चॉकलेट बॉय कसा वाटतोय. अभिनेत्री शाल्वी शहा आणि माझी केमिस्ट्री सुद्धा पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल. –
# तुमचं व्हॅलेंटाईन डे बद्दल काय मत आहे?
माझ्या मते प्रेमाला कोणतीही चौकट असू शकत नाही. व्हॅलेंटाईन डे म्हणजे बदलेला ट्रेंड आहे ज्याचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे आणि मी देखील मनापासून त्याचं स्वागत करतो. अशा प्रकारचे दिनविशेष म्हणजे नात्याला नवेपणा पुन्हा जागरूक करणारे आहे.
# तुमच्या पहिल्या वाहिल्या सिनेमाबद्दल काय सांगाल?
आजपर्यंत अनेक रोमँटिक सिनेमे झाले असतील. प्रेक्षकांना साधारण रोमँटिक सिनेमाच्या जातकुळीबद्दल किंवा कथेबद्दल बऱ्याच गोष्टी माहितही असतील मात्र लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा प्रेमकथे पेक्षा प्रेमाचा एक वेगळाच पैलू दाखविणारा आहे. गुलाबी दुलईत पांघरलेल्या प्रेमापेक्षा अतिशय वेगळ्यापद्धतीचं प्रेम आणि त्याची परिभाषा सांगणारा हा सिनेमा आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडतील असे एलिमेंट सिनेमात आहेत. कोणतिहिओ गोष्ट पहिल्यांदा करत असल्यामुळे त्यात आपण जीव की प्राण ओतून काम करत असतो त्यामुळे माझी सह कलाकार शाल्वी शहा आणि इतर सगळी मंडळी यांनी घेतलेल्या मेहनतीचं चीज व्हावं हीच अपेक्षा.