३ रे विश्व मराठी संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात

३ रे विश्व मराठी संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात

विश्व मराठी संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या संमेलानाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले विश्व मराठी संमेलन आहे. यापुर्वी दोन संमेलने अनुक्रमे मुंबई आणि नवी मुंबई येथे झाली होती.“आंतरराष्ट्रीय दर्जाचे लिखाण केलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आणि मराठी भाषेत कार्य करुन आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या एका तरुणाचा सन्मान करण्याच्या उपक्रमाची या संमेलनापासून सुरुवात करण्यात येणार आहे. या अंतर्गत यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आणि अभिनेता रितेश देशमुख यांचा या संमेलनात गौरव करणार येणार असून संमेलनात तरुण केंद्रस्थानी असतील असे उदय सामंत यांनी सांगितले. संमेलनाबाबत पुण्यातील बहुतेक साहित्यिकांशी चर्चा झाली त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. त्यानुसार बालसाहित्यापासून ते संतसाहित्य आणि लोककलांपर्यत प्रत्येक बाबींचा समावेश कार्यक्रमात असेल. उद्घाटनाच्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. तरुण -ज्येष्ठ कवींचे काव्यसंमेलन, मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरील चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद आदिंचा समावेश संमेलनात असेल. जागतिक स्तरावर मराठी लेखन केलेल्या साहित्यिकांचा सत्कार तसंच बाल साहित्यापासून, संत साहित्य ते लोककलावंतांपर्यंत सगळ्याचा समावेश या संमेलनात असणार आहे. मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन व्हावं, यासाठी युवा पिढी हा संमेलनाचा केंद्रबिंदु असणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns