पुढील तीन महिने शिवाजी मंदिर येथे शंभर प्रयोग होणार आहेत. आमची काहीही अडचण नाही – विश्वस्त
श्री शिवाजी नाट्य मंदिरात एक जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग करणार नाहीत अशी जाहिरात दिल्याने एकच खळबळ उडाली होती त्यावर शिवाजी मंदिर ट्रस्टने आपले म्हणणे मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली यावेळेस बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले “ज्या नाट्यसंस्थेला जी तारीख दिली आहे त्या तारखेला त्या नाट्यसंस्थेने प्रयोग करावा परस्पर दुसऱ्या कोणालाही तारीख देऊ नये हा नियम आम्ही काढल्यानंतर त्यांचा पोटसुळ उठला व हे पेपरात जाहिरात देण्याचे षडयंत्र रचले गेले.
हा जो काय आम्ही नियम लावलेला आहे तो काही मोठा विषय नसून नाटक तर चालूच आहेत काही लोकांनी बहिष्कार घातला असेल पण इतर नाटककार नाटक करतच आहे एका पेपरात नाटक न करण्याची जाहिरात दिली ते कुठल्या माणसाने दिली कुठल्या संस्थेने दिली हे आम्हाला माहित आहे त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या सोडवल्या जातील. बोलणी केली जाईल जे कोणी नाराज असतील त्यांनी यावं, बोलावं यात काही मुद्दे असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू प्रश्न सोडवू मात्र आमचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे सर्वांनी चालावं अशी आमची विनंती आहे.
नाट्यसंस्थेला दिलेल्या तारखांना नाटक करण्याचा अधिकार आहे. बदलण्याचा नाही हा काळाबाजार होतो. तुम्ही वीस रांगा ५०० रुपये तिकीट दर लावणार व आम्ही त्यात काहीच क्लेम करायचा नाही हे बरोबर नाही. यावर आम्ही बंधन आणलेले नाही पण आता आणावे लागेल. प्रेक्षक पैसे देतात म्हणून किती ओरबडायचे. आता आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही.
नाट्य निर्मात्यांच्या व्यवस्थापकाचा शिवाजी मंदिर शी काडीचाही संबंध नाही. संबंध असेल तर नाट्यसंस्था व नाट्यनिर्मत्यांची आहे. जे काही करायचे असेल ते तुम्ही नाट्य निर्मात्यांच्या सहीने पत्र द्या त्यांच्या व्यवस्थापकाने परस्पर तारख्या फिरवायचा नाहीत. नाट्यनिर्माते आरडाओरडा करतात. ते स्वतः धंद्याकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे व्यवस्थापक जस खेळवतो तसं खेळतात, त्यामुळे हा सगळा बाजार चालला आहे. शिवाजी मंदिर मध्ये नाटक करणार नाही हे बोलून किंवा ही जाहिरात देऊन शिवाजी मंदिरची काही अडचण होत नाही पुढील तीन महिने १०० प्रयोग होणार आहेतच, आमची काहीही अडचण नाही अडचण असेल तर ती त्यांची आहे यावर त्यांनी यावं आणि बोलाव असे विश्वस्त ज्ञानेश महाराव म्हणाले.
त्यामुळे ट्रस्टने आता चेंडू नाट्य निर्मत्यांच्या कडे टोलवला असून आता जो काही पुढील निर्णय घ्यायचा आहे तो निर्मात्यांनी घ्यायचा आहे असे यावरून आढळून येते.