जेव्हा मनुष्य रानटी बनतो….

सचिन चिटणीस….. ⭐⭐⭐

समित कक्कडचा रानटी हा चित्रपट शुक्रवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. एक वेगळा प्रयत्न म्हणून साऊथच्या चित्रपटांच्या तोडीचा मराठी चित्रपट अस या चित्रपटाकडे बघावे लागेल आणि हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही इनफॅक्ट साऊथ च्या चित्रपटांना जोरदार टक्कर देतो हे विशेष.

मराठी चित्रपटात एवढं प्रमाणात हिंसा असलेला बहुतेक हा पहिला चित्रपट असावा, सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय हा या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. शरद केळकर याने रानटी या भूमिकेत जोरदार ठसा उमटवला आहे. तर संजय नार्वेकरने सदा राणे ही रानटी भूमिका अक्षरशः जगला आहे.

फर्स्ट हाफ मध्ये चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो तर सेकंड हाफ मध्ये मारधाडचा जरा जास्तीच ओवर डोस झाला आहे. मात्र तरीही जे काय समोर चाललेल आहे ते प्रेक्षकांना आवडते कारण मराठी चित्रपटात एवढी ॲक्शन प्रेक्षक प्रथमच बघत असतो.

गाणी अजून चांगली झाली असती तर चित्रपटात मजा आली असती. चित्रपटात काही लूप होल्स आहेत मात्र समित कक्कडचे दिग्दर्शन प्रेक्षकांचे तिथे लक्ष जाऊ देत नाही, इतका चित्रपट फास्ट बनला आहे. याबद्दल समित कक्कडचे अभिनंदन करावयास हवे. एझाज गुलाब यांची साहसदृष्ये आपल्याला  खिळवून ठेवतात.

संतोष जुवेकर – बाळा या भूमिकेत प्रेक्षकांची वाहवा मिळवतो. कैलास वाघमारे ला दोनच सीन आहेत मात्र हे दोन्ही सीन कैलास ने आपल्या अभिनयाने एका उंचीवर नेऊन ठेवले आहेत.

एकूणच ज्यांना ऍक्शन पट आवडतो त्यांनी हा चित्रपट जरूर जरूर बघावा.

 

‘रानटी’

निर्मिती – पुनीत बालन स्टुडिओ निर्मित

दिग्दर्शक – समित कक्कड

लेखन – हृषिकेश कोळी

संगीत – अजित परब

पार्श्वसंगीत – अमर मोहिले

साहसदृष्ये – एझाज गुलाब

छायाचित्रण- सेतु श्रीराम

संकलन- आशिष म्हात्रे

नृत्यदिग्दर्शन – सुजीत कुमार

वेषभूषा – सचिन लोवलेकर

रंगभूषा – संतोष गायके

गीते-  मंगेश कांगणे

 

कलाकार

शरद केळकर – विष्णू आंग्रे

संजय खापरे – वामन

छाया कदम – पार्वती

शान्वी श्रीवास्तव – मैथिली

संतोष जुवेकर – बाळा

माधव देवचके – भूषण

संजय नार्वेकर – सदा राणे

नागेश भोसले – शिव रुद्र

हितेश भोजराज – धीरज

अक्षया गुरव – माया

जयवंत वाडकर – परशुराम (परशु)

सुशांत शेलार – संजय

कैलास वाघमारे – जळालेला माणूस

नयना  मुखे

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns