‘माझा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपला,’ – अभिनेता गोविंदा
माझा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपला असून आता मला चित्रपटसृष्टीसाठी काम करायचे आहे. गेली अनेक वर्षे मी राजकारणापासून लांब होतो; पण आता मी पुन्हा कमबॅक केलं आहे. मी राजकारणात प्रामाणिकपणे काम करेन.
माजी खासदार आणि प्रसिद्ध अभिनेता गोविंदा अहुजा यांनी आज ( गुरवार) शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
पत्रकार परिषदेत गोविंदा म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक विकास कामे केली आहेत. म्हणूनच आजची मुंबई ही सुंदर मुंबई दिसत आहे. शिंदे यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल मी पार पाडणार असल्याचेही गोविंदा यांनी स्पष्ट केले.
+1
+1
+1
+1