रिंगण्या मध्ये बी.एस. एन.एल चा टॉवर

मिलिंद बेर्डे / लांजा

अखेर कित्येक वर्षाची प्रतिक्षा संपली असुन रिंगण्या मध्ये बी.एस. एन.एल चा टॉवर उभारुन तो कार्यान्वित करण्यात आला आफ्हे. यामुळे रिंगणे गावात प्रत्येक वाडीवस्तीवर नेटवर्क उपलब्ध झाले आहे. २०१८ साला पासुन विद्यमान सरपंच संजय चंद्रकांत आयरे यानी केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित म्हणावे लागेल. ग्रामपंचायत निवडणुकीत नेटवर्क उपलब्ध करण्याचे संजय आयरे यांनी वचन दिले होते. त्यानी आता एकप्रकारे वचनपुर्ती केली आहे.
रिंगणे गावात कोणतेच मोबाईल नेटवर्क उपलब्ध नव्हते. बाजुच्या कोंडगे गावा मध्ये बी. एस. एन. एल. चा टॉवर आहे. तेथुन रिंगण्यातील काही वाड्यां मध्ये नेटवर्क उपलब्ध झाले आहे. तर काही वाड्या अजुन ही नेटवर्क विना वंचित आहेत. यामुळे गेली कित्येक वर्षे सातत्याने रिंगण्यात एखादा मोबाईल टॉवर उभारुन नेटवर्क उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे. २०१८ साली विद्यमान सरपंच संजय चंद्रकांत आयरे यानी ग्रामपंचायत मध्ये याबाबत ठराव केला व टॉवर आणण्यासाठी पाठपुराव्याला खरी सुरुवात केली. प्रथम टॉवरसाठी लागणार्‍या जागेसाठी अंतोजीवाडी येथील सुधाकर आयरे व बंधु यांची मनधरणी करुन जागा देण्याची विनंती संजय आयरे यानी केली सुधाकर आयरे यांनी ही मोठ्या मनाने या विनंतीचा मान राखत विनामोबदला जागा उपलब्ध करुन दिली आहे. जागा निश्चित झाल्यावर या प्रक्रियेने खर्या अर्थाने वेग धरला होता. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढताना विद्यमान सरपंच संजय आयरे यानी कोणत्याही परिस्थितीत गावात टॉवर उभारुन नेटवर्क उपलब्ध करुन देणार असे ग्रामस्थांना वचन दिले होते. निवडुन आल्यावर फार कमी वेळात त्यानी दिलेल्या वचनाची वचनपुर्ती केली आहे.
दरम्यान, रिंगण्यात उभारण्यात आलेल्या टॉवरच्या माध्यमातून २ जी व ३ जी नेटवर्क उपलब्ध झाले आहे. हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी बी. एस. एन. एल कंपनी कडुन एस. डी. ई.- उमेश शिरसाट, जे. टी. ओ. – स्वप्निल रसाळ, एस. डी. ई – विनोद पाटिल (लांजा), अभियंता- प्रसाद सावंत, सुपरवायझर – पर्शुराम ताडेणकर, रिगर – रोशन शिरसेकर, डिश्टुब्युटर – अनिल मोरे, इलेक्ट्रिशियन – निलेश साळवी, संकेत नेवरेकर या अधिकारी व कर्मचार्यानी आपली सेवा बजावली व कित्येक वर्षाचे रिंगणेवासियांचे स्पप्न पुर्ण झाले आहे. सरपंच संजय आयरे यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थ व मुंबईस्थित ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

+1
1
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns