“आम्ही नैतिकतेने काम करणारी माणसं आहोत, कर नाही त्याला डर कशाला” प्रसाद कांबळी

“आम्ही नैतिकतेने काम करणारी माणसं आहोत, कर नाही त्याला डर कशाला” प्रसाद कांबळी

येत्या १६ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक होणार असून त्याचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत प्रसाद कांबळी यांनी स्थापन केलेले ‘आपलं पॅनल’ची आज पत्रकार परिषद मुंबईत झाली यावेळेस बोलताना प्रसाद कांबळी यांनी सांगितले ” आम्ही नैतिकतेने काम करणारी माणसं आहोत त्यामुळे निवडणुकीत एक मत जरी कमी पडले तरी आम्ही इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या माणसांचा पाठिंबा घेणार नाही भले आम्ही विरोधात बसू , मात्र हे गुप्त मतदान असते त्यामुळे जर कोणी गुप्तपणे आम्हाला पाठिंबा दिला तर आमची काही हरकत नाही.

आम्ही निवडणुकीला उभे राहणारच नव्हतो मात्र इतर कोणाच्याही हातात आम्ही उभे न राहिल्याने सत्ता गेल्यास आपल्या रंगमंच कामगारांना न्याय मिळणे कठीण होईल हे उमगल्याने आम्ही निवडणूक लढवण्याचे ठरवले. या नंतर कांबळी यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप आकडेवारीसह फेटाळून लावत विरोधकांच्या आरोपातील हवाच काढून टाकली.

रंगभूमी आपली आहे त्यामुळे पॅनलही आपलंच हवं.

गेली पाच वर्षे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही नाट्य विषयक हालचालींपेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिली. म्हणजे नाट्य विषयक घडामोडी झाल्या नाहीत असे आहे कां? तर तसे नाही.. रंगभूमीच्या विकासासाठी अनेक कामं या पाच वर्षात झाली. पण इतकां स्वच्छ आणि निर्भेळ कारभार काहींना सहन न झाल्याने वैयक्तिक आकासापोटी जाणीवपूर्वक काहींना हाताशी धरून दिशाभूल करण्यात आली.

अनेकांनी आम्ही नाट्य परिषद सोडून पळून जाऊ असा जाहीर दावा केला होता. पण आम्ही कुठेही गेलो नाही किंवा पदावरून मागे झालो नाही. कारण केलेल्या सर्व कामांची आम्ही जबाबदारी घेतली आणि सामोरेही गेलो. कारण, सरते शेवटी ‘कर नाही त्याला डर कशाला’. आम्ही तुमचे आपले आहोत.. तुम्ही आम्हाला आपलं मानलं म्हणून हे करणं शक्य झालं.

आपलं पॅनल मध्ये महिलांचा सहभाग इतका कमी का असा प्रश्न विचारल्यावर सुकन्या कुलकर्णी मोने म्हणाल्या ” सध्या मी रंगभूमीवर काम करत नाही आहे का तर एक स्त्री कलाकार म्हणून खूप काही प्रॉब्लेम्स आहेत. एक कलाकार म्हणून नाट्यगृह हे चांगलं कसं ठेवावं ही नुसती परिषदेची जबाबदारी नसून आपली ही जबाबदारी आहे त्या दृष्टीने आपण कसं वागलं पाहिजे त्या दृष्टीने आपण काय करू शकतो या ज्या स्त्री कलाकार म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आहेत त्या परिषदे पर्यंत पोहोचवणे गरजेचे वाटले म्हणून मी निवडणुकीसाठी उभी आहे. मी नाटकांमध्येही काम करत होते त्यामुळे मला नाटकांमध्ये काम करताना एक स्त्री म्हणून काय काय प्रॉब्लेम्स येतात हे भलीभांती माहीत असल्याने त्याचा पाठपुरावा करून हे प्रॉब्लेम्स वेळोवेळी परिषदेच्या कानावर घालून ते दूर कसे करता येतील यासाठी मी उभी आहे व माझे बघून लवकरच अधिकाधिक स्त्रिया परिषदेवर पुढील काळात तुम्हाला दिसतील याचा मला नक्कीच विश्वास आहे.”

राजन भिसे यांनी नवे नाट्य संकुल कसे असेल या विषयी सविस्तर माहिती दिली

• करोना काळामध्ये यशवंत नाट्य संकुलाला फायर एनोसी नसल्याचे उघड झाले. त्यामुळे यशवंत नाट्यसंकुलाची नव्याने अद्ययावत सुविधांसह उभारणी करणे.
• अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी यशवंत नाट्य संकुलाच्या नव्या इमारतीत जवळपास सव्वा लाख फुटाचे बांधकाम.
• तीन अत्याधुनिक आणि अद्ययावत नाट्यगृहांची उभारणी (अनुक्रमे आसनव्यवस्था ८००, २७५, १२५)
• मराठी रंगभूमीचा अभिजात वारसा जपणारे संग्रहालय आणि ग्रंथालय
• परिषदेसह आठ घटक संस्थाची कार्यालये
• तालमींसाठी सुसज्ज सभागृह
• नाट्य विषयक विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी कॅफे कट्टाची निर्मिती
• रंगकर्मीसाठी अल्पदरात निवास व्यवस्था
• नाट्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने नाट्य प्रयोगशाळा सुरु करणे.
======================
*मुंबई (मध्यवर्ती) उमेदवार*
१. नवनाथ (प्रसाद) कांबळी
२. सुकन्या कुलकर्णी – मोने
३. मंगेश कदम
४. राजन भिसे
५. प्रमोद पवार
६. संतोष काणेकर
७. रत्नकांत जगताप
८. सुनील देवळेकर
९. अनिल कदम
१०. प्रभाकर वारसे
*मुंबई उपनगर उमेदवार*
१. दिगंबर प्रभू
२. अविनाश नारकर
३. अशोक नारकर
४. ऐश्वर्या नारकर
मतदान – रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३
सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३०

+1
1.7k
+1
1k
+1
266
+1
21
IPRoyal Pawns