भांबेड मध्ये अवतरली पंढरी

भांबेड मध्ये अवतरली पंढरी

( मिलिंद बेर्डे/ लांजा )

लांजा:–
आषाढी एकादशीचे औचित्य साधून भांबेड येथील प्रतापराव माने विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच वै. ह भ प सोनूबुवा कुर्णेकर पायी दिंडी समिती आणि भांबेड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन व दर्शन घडावे यासाठी भांबेड विद्यालय ते विठ्ठल मंदिर गांगण वाडी अशा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
वारी म्हणजे भक्तांची पर्वणी, मोक्षाचे खुले दार, एक अमुतुल्य सोहळा जणु स्वर्गाची वाट.
याची प्रचिती प्रत्यक्ष भांबेड वाशियांना आली टाळ, मृदुगांच्या जयघोषात पाडुरंगाच्या नामाने जयघोष करत भांबेड येथे प्रत्यक्षात अवतरली पंढरी याची देहि याची डोळा पाहुन भांबेड वासी मंत्रमुग्ध झाले .
या संपूर्ण दिंडी सोहळ्या मधे विद्यार्थी, शिक्षक, भांबेड पंचक्रोशी येथील ग्रामस्त, वारकरी तसेच आकर्षक वेशभूषा, महिला वर्गाने तर नऊवारी साड्या, डोक्यावर तुळस, हाती टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामचा गजर यामुळे प्रत्यक्षात पाडुरंगाची पंढरी असा आभास भांबेड वाशियांना दिसून येत होता .
। तुझ्याप्रति भक्ति पूण्य रामकृष्ण हरि।
। जन्ममासी येऊनी पहावी ही पंढरी ।

छायाचित्रे व व्हिडीओ – मिलिंद बेर्डे

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns