मिलिंद बेर्डे/लांजा
लांजा तालुक्यातील गोविळ गावी ग्रामदेवता श्री आदिष्टी देवीच्या पुरातन मंदिरातील पूजेचे ५०वे सुवर्ण महोत्सवी वर्ष “गोविळ ग्रामस्थ धनगर समाज” साजरे करत आहे. येत्या बुधवार, दि. ०८ मार्च २०२३ रोजी पूजा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी “गोविळ ग्रामस्थ धनगर समाज” ग्रामस्थ व चाकरमानी एकत्रितपणे मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात. तसेच यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील धनगर समाज, समस्त गोविळ ग्रामस्थ व अन्य जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभाग घेतात. सुवर्णमहोत्सवानिमित्त पूजेला येणाऱ्या सर्व श्री आदिष्टी देवी भक्तजणांनकरिता महाप्रसाद देण्यात येणार आहे. पूजेनिमित्त ८ मार्च रात्री.०८.०० वाजल्यापासून “जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा” चे भव्य स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धेत विजय संघाना प्रथम पारितोषिक २१,१११/- रोख, द्वितीय पारितोषिक रु. १५,१११/- रोख, आणि तृतीय पारितोषिक रु. ९,१११/- रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व पालखी नृत्य स्पर्धेतील संघाना मोफत प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक संघ भाग घेऊ शकतात.
सदर उत्सवात सहभागी होण्यासाठी “गोविळ ग्रामस्थ धनगर समाज मंडळ” समस्त रत्नागिरीवासियांना निमंत्रित करीत आहे. नवीन पिढीची नाळ आपल्या मातीशी जोडण्यासाठी आपली परंपरा व संस्कृती जपणे गरजेचे आहे.