विनय गांगण यांना उमेदवरी मिळावी म्हणून…

लांजा/मिलिंद बेर्डे
भांबेड पंचायत समिती गणा मधुन रत्नागिरी युवा सेना जिल्हा प्रमुख विनय गांगण यांना उमेदवारी मिळावी म्हणून युवासेना, शिवसेना, भांबेड व्यापारी वर्ग तसेच शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे .
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोड़त जाहिर झाल्या असून भांबेड पंचायत समिती गण हा सर्वसाधारण साठी खुला झाला आहे. भांबेड गावचे माजी सरपंच, व्यापारी संघटनचे अधक्ष तशेच रत्नागिरी जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण यांना उमेदवारी मिळावी म्हणून या परिसरातून मागणी जोर धरू लागली आहे .
भांबेड पंचायत समिती गणातून यापूर्वी युवराज हांदे व त्यानंतर त्यांची पत्नी युगंधरा हांदे हेच दाम्पत्य गेली पंधरा वर्षे पेक्षा अधिक काळ शिवसेने कडून निवडून येत असलेल्या हांदे दाम्पत्यां विषयी शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पाहायला मिळत असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेने उमेदवार बदलावा अन्यथा ही जागा शिवसेनेला गमवावी लागेल असाच अनेकांनी पवित्रा घेतला आहे.

विनय गांगण रत्नागिरी युवा सेना जिल्हा प्रमुख़ म्हणून गेले ४ वर्ष कार्यरत आहेत रत्नागिरी जिल्हातील युवा संघटना मजबूत करण्याचे काम त्यांनी केले असून राजन साळवी यांचे निष्ठावंत व निकटवर्ती म्हणून मानले जाते म्हणूनच विनय गांगण यांना उमेदवारी मिळावी याची मागणी भांबेड पंचायत समिती गणातून जोर धरू लागली आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns