जी/दक्षिण, जी/उत्तर विभागात काही परिसरांत पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी बंद.

जी/दक्षिण, जी/उत्तर विभागात काही परिसरांत पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी बंद.

लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात १४५० मि.मी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी ८ वा. सुरु होऊन ते मंगळवारी, १५ मार्चला दुपारी २ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे पालिकेच्या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागात काही परिसरांमध्ये पाणी मिळणार नाही व जी/दक्षिण विभागातील काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग या भागांमंध्ये १४ मार्च रोजी दु. २.३० ते दु. ३.३० वा. डिलाईड रोड येथे आणि दु. ३.३० ते सायं. ७ वा. शहर पाणीपुरवठा होणार नाही. ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे.
जी/उत्तर वि•ाागातील संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, संपूर्ण माहीम, माटूंगा आणि दादर येथील तीनही पश्चिम विभागांत सोमवार १४ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ ते सायं. ७.०० वाजता तसेच सायं. ७ ते रात्री १० वा. पाणीपुरवठा होणार नाही. (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे.)
जी/दक्षिण विभागात ना. म. जोशी मार्ग, डिलाईड रोड, बी.डी.डी., सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग येथे मंगळवारी येत्या १५ मार्च रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वा. डिलाईड रोड पाणीपुरवठा होणार नाही. (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे.)
जी/दक्षिण विभागात धोबीघाट, सातरस्ता येथे मंगळवारी येत्या १५ मार्च रोजी पहाटे ४. ते सकाळी ७ वा. डिलाईड रोड येथे पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. (ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ आहे.)
या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns