सचिन चिटणीस…….
साधी आणि निरागस मुलगी अनुराधा (तेजस्विनी पंडित) भोवती ही वेबसिरीज फिरते. वकील शंतनू (सचित पाटील) अनुराधाचे वडील व राजकारणी रमाकांत शिंदे यांना एका कोर्ट मॅटर मधून सोडवतो या कारणाने अनुराधा व शांतनूच्यात मैत्री होते व मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होते.
ज्या लॉ फर्ममध्ये शंतनू काम करत असतो त्या फर्मच्या संस्थापकाची मुलगी निशा (सोनाली खरे) शंतनूसोबत जवळून काम केल्यामुळे प्रेमात पडते.
दरम्यान, आपण ( प्रेक्षक ) अनुराधाला एका वेगळ्या अवतारात तिचा बॉस, जिम ट्रेनर आणि क्लबच्या मालकाचा खून करताना पाहतो. तिच्याविरुद्ध व्हिडिओ पुरावे सापडल्यानंतर तिच्यावर मालिका हत्येचा आरोप लागतो. मात्र, ती निर्दोष असल्याची बाजू मांडते आणि या हत्यांशी आपला काहीही संबंध नाही, असे ती म्हणते. शंतनू तिची केस लढतो कारण त्याला खात्री आहे की मारेकरी त्याच्या प्रियकराचा सारखाच आहे आणि तो सुटलेला आहे. पण अनुराधा खरच निर्दोष आहे का? आणि असेल तर ती हे खून का करते. सुरवातीलाच कथानक दाखवले गेल्याने पुढे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासारखे फारसे काही उरत नाही.
शेवटच्या एपिसोडमध्ये दिग्दर्शकाने आश्चर्याचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे तो थोड्याफार प्रमाणात बसतो देखील मात्र आताचा प्रेक्षक खूप हुशार असल्याने त्यास तो धक्का बसत नाही. कारण त्याने अगोदरच या धक्काचा अंदाज बांधला असतो. तेजस्विनी पंडित हिने दोन भिन्न पात्रे साकारताना आपले सर्व कसब पणाला लावले आहे आणि त्यात ती यशस्वी देखील झाली आहे. सचित पाटीलनेही शंतनू चांगला रंगवला आहे. विद्याधर जोशी यांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सोनाली खरेही, स्नेहलता वसईकर आणि संजय खापरे उत्तम.
प्रचंड शिव्यांनी भरलेली ही वेबसिरीज पाहतांना मात्र जरा आजूबाजूला लहान मुले तर नाहीत ना हे बघूनच…