रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्हर्चुअल कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून 5G नेटवर्क संदर्भात मोठी घोषणा केली आहे. 5G जीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून, सरकारने 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू करताच कंपनीकडून 5G सेवा सुरू केली जाईल. सप्टेंबरमध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी पुढे म्हणाले, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये इतका आहे.
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की कोरोना महामारी असूनही कंपनीचा लाभांश वाढला आहे. तर निता अंबानी म्हणाल्या की कोरोना साथीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनकडून बरीच कामे केली गेली आहेत.
*मुकेश अंबानी यांनी केली जिओ फोन नेक्स्ट’ची घोषणा*
भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अँप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी
संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे.
गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.
पुढे मुकेश अंबानी म्हणाले, अक्षय ऊर्जेमध्ये 60 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असून, 2030 पर्यंत 100 GW सौर उर्जा स्थापित करण्यात येईल.
रिलायंसच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. जिओ इंस्टिट्यूट संदर्भात नीता अंबानी यांनी सांगितलं की, हे इन्स्टिट्यूट याचवर्षी सुरु होईल. या इंस्टिट्यूटची स्थापना नवी मुंबईत केली जात आहे.
नीता अंबानी यांनी एजीएममध्ये म्हटलं की, आम्ही कोरोना काळात बालकांच्या संदर्भातील खेळांसंदर्भात काही नव्या गोष्टी सुरु केल्यात. आम्ही या माध्यमातून 2.15 कोटी मुलांपर्यंत पोहोचलो आहोत. नीता अंबानी म्हणाल्या की, देश आणि समाजाला मजबूत बनवायचं असेल तर महिला आणि मुलींना सशक्त बनवणं गरजेचं आहे. त्या म्हणाल्या की, व्यवसायासोबत समाजाला सशक्त बनवणे आमचं मिशन आहे.
रिलायन्स कडून पाच महत्वाचे मिशन लॉन्च केले आहेत. यात पहिलं मिशन ऑक्सिजन, दुसरं मिशन कोविड इंफ्रा, तिसरं मिशन अन्न सेवा, चौथं मिशन एम्प्लाई केअर आणि पाचवं मिशन वॅक्सीन सुरक्षा हे आहे, असं त्यांनी सांगितलं.
नीता अंबानी म्हणाल्या की,
आरआयएल न 2 आठवड्यांमध्ये प्रत्येक दिवशी 1100 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं आहे. देशात मेडिकल ऑक्सीजनचं 11 टक्के उत्पादन आरआयएल करत आहे.
आपल्या भाषणात नीता अंबानी म्हणाल्या की, रिलायन्सनं वॅक्सिनेशनचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. जिओ हेल्थ अँपच्या मदतीनं आमचा मार्ग सुकर केला आहे. त्यांनी सांगितलं की, कोविड काळात आजपर्यंत आम्ही 7.5 कोटी गरजवंतांना जेवण दिलं आहे.