एका रुपयात आरोग्याची चाचणी
१० रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करून देणार.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार.
ग्रामीण भागातील विध्यार्थांना मोफत बस सेवा देणार.
पहिल्या ३०० युनिट विजेचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार.
शिवसेनेच्या शिवजीपार्क वरील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिरनामाच सादर केला.
ते पुढे म्हणाले “शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू हे विसरू नका. शिवरायांचा महाराष्ट्र कोणाची लाचारी करणार नाही. सुडाचे राजकारण शिवसेना सहन करणार नाही”
*उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इतर महत्वाचे मुद्दे*
– जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि मातांनो. गेली पन्नास वर्ष आपण ही परंपरा पाळत आहोत. जगाच्या पाठीवर अशी एकमेव संघटना आहे की, न चुकता विजयादशमी शिवतीर्थावर साजरी करते.
– विजयादशमीला शस्त्रपूजा करतात माझी शस्त्र ही महाराष्ट्रभर पसरलेली आहेत.
यावेळेस एका महिन्यात दोन विजयादशमी आल्या आहेत एक आज आणि दुसरी येत्या २४ तारखेला, असा क्वचितच योग येतो, विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालेलो आहे.
– रामजन्मभूमी व प्रभू रामाचे मंदिर व्हावे ही शिवसेनेची मागणी आहे.
– प्रकाशजी तुमच्या धनगराच्या काठीला तलवारीची धार असली पाहिजे. अन्यायाच्या विरोधात लढणारी तलवार असली पाहिजे.
– शिवसेना वैर करेल तर उघड उघड करेल.
– शिवसेना कधीही कोणासमोर झुकणार नाही. एकतर मरेन किंवा मारायची शिवसैनिकाची जात आहे.
– जोपर्यंत आम्ही त्यांचे टारगेट आहोत तोपर्यंत आमचे देखील टारगेट तेच राहणार.
– मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकले होते परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले.
– प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल.
– तुम्ही ठेवलेला विश्वासा बद्दल मी मनापासून शिवसैनिकांचे आभार मानतो.
– मराठी माणूस आणि मराठी तरुणाला चालायला शिवसेनेने शिकवल.
– ज्यांची तिकिटे कापली त्यांची माफी मागतो.