एमपीएससी परीक्षेच्या आधी ती पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला, राज्यभरातील एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा पवित्रा पाहता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं जाहीर केलं. त्याप्रमाणे या परीक्षांची तारीख उद्या जाहीर होईल व परीक्षा आठवडाभरात होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे केवळ काही दिवसांसाठी १४ तारखेची परीक्षा पुढे ढकलत आहोत मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा अशी सूचना केली आहे येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होणार आहे परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण कोविडच आहे. परीक्षेची व्यवस्था करावी लागते यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची तयारी करून घ्यावी लागणार आहे. त्यांची चाचणी करणं गरजेच आहे, ज्यांना लस दिली आहे त्यांनाच इथे नेमल जाईल, ही माझी सूचना आहे.





























