मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर – मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप
ग्रुह प्रकल्पांना अधिमूल्यावर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय, यामुळे बांधकाम व्यवसायिकांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत सवलत मिळणार. तसेच ग्राहकांनाही लाभ होणार सवलतीचा लाभ घेणाऱ्यांना संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार. रखडलेले गृह प्रकल्प मार्गी लागून घरे स्वस्त होणार.
पॉप सिंगर मायकल जॅक्सन याच्या तेवीस वर्षांपूर्वी झालेल्या पॉप शो साठी आकारण्यात आलेला तीन कोटी 34 लाख रुपयांचा करमणूक कर मे विझक्राफ्ट इंटरटेनमेंट एजन्सीला परत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला पुन्हा निर्णय.
ठाण्यात पंधरा पाणबगळ्यांचा संशयास्पद मृत्यू नागरिकांमध्ये बर्ड फ्लूच्या भीतीने घबराट.
सात महिन्यात मध्य रेल्वेने विनातिकीट लोकल प्रवाशांकडून दोन कोटीचा दंड केला वसूल.
देवगड हापूस आंबा मुंबईत या हंगामातील देवगड मधील कुणकेश्वर येथील मुहूर्ताचा आंबा मुंबई बाजारात दाखल झाला आहे.
मुंबई सेंटर चे नाव नाना शंकर शेठ टर्मिनस होणार – शिवसेना खासदार अरविंद सावंत.
ऑनलाइन गैरव्यवहारा संदर्भात जबाबदारी बँके वरच ग्राहक आयोगाचा निर्णय.