प्रियांका चोप्रा निर्मित आणि आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी या मराठी चित्रपटाने १८व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन.
चित्रपटरसिकांसाठी मेजवानी असलेला १८ वा‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सव’ १ मार्चपासून सुरू होत आहे. या महोत्सवात अंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये इराण, नेपाळ, चायना, कुर्दिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, कोरिया, भूतान, इस्राइल, कझाकीस्थान, श्रीलंका तसेच राष्ट्रीय सिनेमांमध्ये बंगाली, मराठी, मणिपुरी, कश्मिरी, मल्याळम, असामी, तेलगु, कन्नड, पंजाबी, हिंदी भाषीक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यात एकूण ४२ चित्रपट आणि २६ लघुपटांचा समावेश आहे. आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांची स्पर्धा, स्पेक्ट्रम एशिया, इंडियन व्हिस्टा, माय मराठी, समांतर सिनेमा, अजरामर सिनेमा हे विभाग महोत्सवात असतील.
प्रियांका चोप्रा निर्मित आणि आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी’ या चित्रपटाने १८व्या थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होईल, १ मार्च ते ६ मार्च या कालावधीत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर येथे हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी होईल तसेच १ तारखेपासून रोज सहा चित्रपट दाखवले जातील, असे महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी सांगितले असून महोत्सवा संदर्भातील माहिती खालील संकेतस्थळा वर उपलब्ध आहे.
http://www.asianfilmfestival.in/