“शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार असे वचन आपण शिवसेनाप्रमुखांना दिले होते ते खरे केले, पूर्वीच्या विरोधकांबरोबर सरकार स्थापन केले याचा अर्थ मी भगवा खाली ठेवलेला नाही. भगवा माझ्या अंतरंगात आहे तो रंग बदलणार नाही.” वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजित शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
मित्रपक्षानेे मला खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला पण ते पूर्वीचे मित्रच उघडे पडले, मी नुसता उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, प्राण गेले तरी मी खोटे बोलणार नाही शिवसैनिक माझे कवच कुंडले आहेत त्यामुळे मला कोणाची पर्वा नाही.
छायाचित्र : दीपक साळवी
































