मिरांडा वॉर्निंग मध्ये जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत!

*’मिरांडा वॉर्निंग मध्ये जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत!*

*एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न! जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक समोर*

*”मिरांडा वॉर्निंग’च्या नव्या पोस्टरने वाढवलं गूढ*

*२७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित*

मालिका, चित्रपटांतील अभिनयाद्वारे घरोघरी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता मिरांडा वॉर्निंग या चित्रपटात दिसणार आहे. अत्यंत रंजक भूमिकेतून जान्हवी प्रेक्षकांसमोर येणार असून, २७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी या पूर्वी २०२३मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे.

हेरिटेजवाडी नावाच्या फार्महाऊसवर एक खूनाची घटना उघडकीस येते आणि त्यानंतर एक थरारक शोध सुरू होतो, या शोधात काय काय घडतं याची रंजक गोष्ट मिरांडा वॉर्निंग या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स, थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचे या पूर्वी झाले आहेत. आता मिरांडा हाऊस या चित्रपटातून उत्कृष्ट कथानक, कसलेले कलाकार असलेली तांत्रिकदृष्ट्या सक्षम कलाकृती पहायला मिळणार आहे.

‘भाग्य दिले तू मला’सारखा टीव्ही मालिका, ‘सायको रंगा’सारख्या चित्रपटातून जान्हवीनं तिच्यातील अभिनेत्रीचं दर्शन घडवलं आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून तिची लोकप्रियता आणखी वाढली. आता जान्हवी पुन्हा एकदा सक्षम अभिनेत्री म्हणून मिरांडा हाऊस या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात तिच्यासारख्या अभिनेत्रीचं असणं उत्सुकता वाढवणारं आहे. तिची भूमिका नेमकी काय आहे, या बद्दलही उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे मिरांडा हाऊस चित्रपटाविषयीची सर्व उत्तरं मिळवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

IPRoyal Pawns