मयुरा प्रधान दिग्दर्शित “तुला पाहता” १० जुलैपासून मराठीसह हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार!!

*सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते “तुला पाहता” चित्रपटाचा ट्रेलर लाँच संपन्न*

*मयुरा प्रधान दिग्दर्शित “तुला पाहता” १० जुलैपासून मराठीसह हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार!!*

*मनाला भिडणाऱ्या “तुला पाहता” चित्रपाटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच*

*”तुला पाहता’ मधून उलगडणार दोन पिढ्यांची प्रेमकहाणी*

आजवर प्रेमकथा असलेल्या चित्रपटात एक प्रेमकहाणी दाखवली गेली. मात्र, “तुला पाहता” या चित्रपटातून  १९७१ आणि २०२६  या दोन काळांतील दोन प्रेमकहाण्या उलगडण्यात येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते

मोठ्या दिमाखात मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट – प्रोग्रामिंग आणि डिस्ट्रिब्युशन मयांक श्रॉफ, सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० जुलैला हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी ‘तुला पाहता’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन मयुरा प्रधान यांचंच आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याच चित्रपटासाठी तिहेरी जबाबदारी निभावली आहे.  पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते  सतीश पुळेकर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

“तुला पाहता” हे चित्रपटाचे टायटल मला खूप आवडले, चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला मनःपूर्वक शुभेच्छा असे अभिनेते मुश्ताफ खान यांनी सांगितले.

ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून.. त्याच्या अचानक जाण्यानं आणि पुन्हा परतण्यानं तिच्या आयुष्यात काय खळबळ उडते त्याची तरल कहाणी या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. त्याशिवाय आताच्या काळातील एका तरुण जोडप्याची प्रेमकथा ‘तुला पाहता’ या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रेमकथा, नातेसंबंध, एकत्र कुटुंब असे अनेक पदर या चित्रपटातील कथानकाला आहेत. त्यामुळेच अत्यंत हळवी कथा, सुखद संगीत, उत्तम अभिनय, संवेदनशील लेखन या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या टीजरला, गाण्याला रसिक प्रेक्षकांचा   उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमधूनही  या चित्रपटाविषयी अधिकच  उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे १० जुलैला  प्रदर्शित होणारा “तुला पाहता” हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

 

*Trailer Link*

 

IPRoyal Pawns