*1,00,000/- ची कर्तव्य रूपी मदत*
अद्वैत थिएटर निर्मित “*शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला* “हया नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग काल 27 सप्टेंबर रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर ,पुणे येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला आणि विशेष म्हणजे निर्माते राहुल भंडारे आणि नाटकाच्या टीम कडून अवकाळी पाऊस परिस्थिती मुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून 1,00,000/- रुपयांची कर्तव्य रूपी मदत जाहीर केली .आणि लवकरच ही मदत महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त करण्यात येईल.नाटकाच वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील कलाकार हे शेतकरी आहेत . 🙏🚩































