विश्व मराठी संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत आहे. या संमेलनात जगभरातील साहित्यिक आणि उद्योजक सहभागी झाले आहेत. अशाच एका नामवंत उद्योजकांनी, ज्यांनी आपल्या उद्योगाचा ठसा जागतिक स्तरावर उमटवला आहे— ब्रिंटनस कार्पेट्स एशिया प्रायव्हेट लिमिटेड चे अध्यक्ष सतीश करंजकर यांनी विश्व मराठी संमेलनात उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
यावेळी ते म्हणाले, ” उदय सामंत हे खऱ्या अर्थाने मराठी उद्योजक आणि तरुणांसाठी आशेचा किरण आहेत. त्यांचे कार्य मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारे असून त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक पाठबळ देणारे आहे. त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे अनेक मराठी उद्योजकांना संधी मिळत आहे, त्यांचे व्यवसाय वाढत आहेत आणि तरुणांना उद्योग क्षेत्रात स्थिरता मिळत आहे. मराठी माणसाने मोठे व्हावे, स्वतःचा व्यवसाय उभा करावा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे यासाठी उदय सामंत यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठी व्यावसायिकांना नवी ऊर्जा मिळत असून नव्या संधी उपलब्ध होत आहेत.”
ब्रिंटनस कार्पेट्स ही कंपनी जगभरातील काही प्रतिष्ठित ग्राहकांसाठी कार्पेट्स तयार करते आणि तिची ग्राहक यादी अत्यंत उल्लेखनीय आहे. ब्रिंटनस लिमिटेड ची उत्पादन केंद्रे पोर्तुगाल, पोलंड आणि भारतातील पुणे (मुळशी) येथे आहेत. ब्रिंटनसचे कार्पेट्स ७० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात, त्यामुळेच कंपनी कार्पेट उत्पादनाच्या क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.
स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगताना सतीश करंजकर म्हणाले, “ब्रिंटनस कार्पेट्स एशिया प्रा. लि. ही कंपनी ब्रिंटनस यूकेसाठी स्टँडर्ड कार्पेट रेंजेस तयार करते तसेच जगभरातील खास ऑर्डर्स पूर्ण करते. कंपनीने भारतात स्वतःची मजबूत ग्राहक यादी तयार केली असून त्यात ताज हॉटेल, लिला पॅलेस, ओबेरॉय हॉटेल, हयात हॉटेल, ली मेरिडियन, आयटीसी हॉटेल तसेच मुंबई, दिल्ली आणि बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांचा समावेश आहे