नव्या-जुन्यांचे कवी संमेलन – विश्व मराठी संमेलन, पुणे
मराठी साहित्यात कवितेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच भावनेतून विश्व मराठी संमेलन, पुणे येथे नव्या-जुन्यांचे कवी संमेलन रंगले.
या संमेलनात कवी रामदास फुटाणे, कवी अशोक नायगांवकर, कवी विठ्ठल वाघ, कवी अरुण म्हात्रे, कवी महेश केळूसकर, अभिनेते आणि कवी किशोर कदम (सौमित्र), श्रीमती हर्षदा सुखटणकर (बेळगाव), श्रीमती मेघना वर्तक (दुबई), श्री. नारायण पुरी (संभाजीनगर), श्री. अपूर्व राजपूत, श्री. आबा पाटील (निपाणी), कवी वैभव जोशी आणि अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी आपापल्या शैलीत रसिकांची मने जिंकली.
मराठी भाषेची शब्दरचना आणि नव्या-जुन्या काळातील कवितांमधील प्रेमाच्या नव्या संवेदना यामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. कवितेच्या प्रत्येक ओळीला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला आणि मराठी कवितेची श्रीमंती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली!