…. या महिन्यात होणार १०० व्या नाट्यसंमेलनाचा सांगता समारंभ
१०० व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ ५ जानेवारी रोजी पुणे येथे संपन्न झाला.
६ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. ७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध शाखा व कलाकार सहभागी झाले होते.
त्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यात अहमदनगर सोलापूर बीड लातूर नागपूर मुंबई ही शहर होती.
आता शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा सांगता समारोह कधी होणार याविषयी नाट्य रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे मात्र हा सांगता समारोह पुढे पुढे ढकलण्यात येत आहे यात मुख्य म्हणजे निवडणुका आल्याने संमेलन पुढे ढकलले गेले आमच्या खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आता या संमेलनाचा सांगता समारोह एप्रिल महिन्यात रत्नागिरीत होणार असे कळत आहे.