नवीन श्यामची आई चित्रपटाला उचलेगिरीसाठी नोटीस 

नवीन श्यामची आई चित्रपटाला उचलेगिरीसाठी नोटीस

साने गुरुजी यांच्या आत्मानुभवातून निर्माण झालेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाला उचलेगिरी केल्याप्रकरणी ॲडव्होकेट बिना पै यांनी अगदी तीन दिवसां वरती प्रदर्शित होणाऱ्या भारतातील पहिल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जुन्या ‘श्यामची आई’ चित्रपटातील गाणी, कथानक आदींची उचलेगिरी केल्याप्रकरणी नवीन ‘श्यामची आई’ चित्रपट निर्मात्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याने हा चित्रपट वादात सापडला असून मराठी चित्रपट सृष्टीत खळबळ माजली आहे.

आचार्य अत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटातील कथाप्रसंग, गाणी आदींच्या पुनर्वापरासाठी कोणतीही अनुमती नघेता काॅपी राईट कायद्याचा भंग करणाऱ्या निर्माते-दिग्दर्शकांना जाब विचारणारी ही चार पानी नोटीस आज ॲडव्होकेट बीना पै यांनी पाठवली आहे. त्या आचार्य अत्रे यांची कन्या आणि नामवंत कवयत्री शिरीष पै यांच्या स्नुषा आहेत.

आदर्श संस्कारांसाठी ज्या श्यामची आई या पुस्तक आणि चित्रपटाचा मराठी माणसांवर आजही प्रभाव आहे, तोच कथाविषय असा नव्याने चूकीच्या कारणावरून वादग्रस्त ठरावा हे अत्यंत क्लेशदायक आहे.

IPRoyal Pawns