पशुंवर प्रेम करण्याचा संदेश देणारा ‘ गाभ ‘
सचिन चिटणीस
या चित्रपटास मिळत आहेत ⭐⭐⭐ स्टार
‘गाभा’ हा चित्रपट गावाकडच्या मातीत घडलेल्या असून, रेडा आणि माणूस या दोघांच्या मधील नातं उलगडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे. विविध चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार मिळालेला हा चित्रपट पशु प्रेमाचा संदेश देत समाजातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. कैलास वाघमारे आणि सायली बांदकरच्या अप्रतिम अभिनया मुळे हा चित्रपट लक्षात राहतो.फुलवा ( सायली बांदकर ) ही गावात राहणारी मुलगी रेडा व म्हैस यांच्यात समागम घडून आणण्याचे काम करत असते या गावात फक्त फुलवाकडेच रेडा असल्याने तिच्या रेड्याला फार किंमत असते. तर
बी. कॉमपर्यंत शिकूनही शेती करणारा दादू आपल्या आजीच्या इच्छे खातर तिच्या पेन्शनच्या पैशांतून एक म्हैस विकत घेतो. आजी म्हशीचं नाव फुलवा ठेवते. पूर्वाच्या या आगळ्यावेगळ्या धंद्यामुळे तिचं लग्न होत नसतं. इकडे वय होऊनही दादू लग्न करत नसतो. त्यामुळे गावातील लोक त्याला टोमणेही मारत असतात. मात्र फुलवा आणि जादूचा अगोदर असलेल्या प्रेम व त्या प्रेमात आलेला काही कारणास्तव अडथळा यामुळे फुलवा किंवा दादू दोघेही लग्न करण्यास तयार नसतात.
पशूंवर प्रेम करण्याचा संदेश देताना स्त्रीभ्रूणहत्या आणि रेडा जन्मला म्हणून कसायाला विकणाऱ्या वृत्तीची अचूक सांगड घालण्यात आली आहे. चित्रपट सुरु झाल्यानंतर संथ गतीने कथा पुढे सरकते, पण पटकथेतील काही पैलू अखेरपर्यंत उलगडू न देता रहस्य कायम राहतं. त्यामुळे शेवटपर्यंत चित्रपट पाहण्याची उत्सुकता राहते. मध्यंतरानंतर खऱ्या अर्थानं चित्रपट पकड घेतो आणि खिळवून ठेवतो.
वातावरण निर्मिती चांगली आहे. सिनेमॅटोग्राफी सामान्य आहे. दोन्ही गाणी चांगली झाली आहेत.सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. कैलास वाघमारेचे कौतुक, सायली बांदकरने बोलीभाषेचा अचूक लहेजा पकडून रंगवलेली फुलवा जितकी खमकी आहे, तितकीच प्रेमळही आहे. गुंड्याप्पाच्या भूमिकेत उमेश बोळके लक्षत राहतो. मित्राच्या भूमिकेत विकास पाटील फीट बसला आहे. यांना वसुंधरा पोखरणकर श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांनीही उत्तम साथ दिली आहे.