डाॅ. गिरीश ओक यांची रंगभूमीवर हॅट् ट्रिक

डाॅ. गिरीश ओक यांची रंगभूमीवर हॅट् ट्रिक

एकाच नाटकात तीन वेगळ्या वेगळ्या वयाच्या व्यक्तिरेखा एकाच अभिनेत्याला करायला मिळण्यामागे मोठं भाग्य असावं लागतं असंच म्हणावं लागेल आणि हे घडलं आहे डॉक्टर गिरीश ओक यांच्या बाबतीत.

पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं तुझं आहे तुजपाशी नावाचं नाटक १९५७ साली रंगभूमीवर आलं. त्यावेळी त्याचे दिग्दर्शक होते स्वतःच नाटककार पु. ल. देशपांडे. त्यात काकाजींची भूमिका दाजी भाटवडेकरांनी केली होती आणि राजाभाऊ परांजपे सारखे कलाकार त्यात काम करत होते. अत्यंत गोड आणि सुंदर लेखन असलेलं हे नाटक आहे म्हणूनच आजही प्रेक्षक आणि कलावंत ते विसरलेले नाहीत.

डॉक्टर गिरीश ओक यांनी या नाटकात सुरुवातीला श्याम ही नायकाची भूमिका केली त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी डॉक्टर सतीश ही भूमिका केली आणि आता ते यातली काकाजीची भूमिका करत आहेत. म्हणजे एकाच नाटकात प्रत्येक व्यक्तिरेखांच्या वयाला शोभणाऱ्या भूमिका त्यांना त्या- त्या वयात मिळाल्या हे त्यांचं भाग्यच आहे. या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की होय. असं क्वचितच झालं असावँ. १९८१ च्या सुमाराला नागपूरला अपेक्षा नावाची संस्था सुरू झाली होती आणि त्या संस्थेने केलेल्या तीन नाटकांमध्ये तुझं आहे तुजपाशी हे नाटक हे होतं या नाटकात त्यावेळी मोहन कोठीवान काकाजी होते डॉक्टर सतीश ही भूमिका धनंजय भावे करत होते आणि मी श्याम ही नायकाची भूमिका करत होतो. बऱ्याच वर्षांपूर्वी साहित्य संघाने महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं हेच नाटक बसवलं होतं त्यात मी डाॅ. सतीश केला होता. काकाजी तर दाजी होते. अतूल आणि सोनिया परचुरे होते, इला भाटे नं उषा आणि जयंत सावरकरांनी आचार्य या भूमिका केल्या होत्या आणि आता पुण्याचे भैरवनाथ शेरखाने यांनी खूपच आग्रह केला आणि आता काकाजी करतोय. पहिला प्रयोग येत्या शनिवारी पुण्यात होतोय.

मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदांत एंटरटेनमेंट प्रकाशित नवीन संचातल्या तुझं आहे तुजपाशी मध्ये अमोल बावडेकर अभिजित गुरु, समिधा गुरू, प्रचिती आली कलावंत असून विजय पटवर्धन दिग्दर्शक आहेत. या निमित्तानं डाॅक्टर ओक हॅट् ट्रिक साधणार आहेत.
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –

IPRoyal Pawns