परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे संबोधनपाककडून एलओसीवर वारंवार शस्त्रसंधीचंउल्लंघन सुरू आहे’पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही.पाकच्या गोळीबारात १६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू’भारताने पाक ची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली. आम्ही निष्पाप लोकांना मारलं नाही. काल केवळ दहशतवादी अड्ड्यांवरच भारताने स्ट्राईक केला. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला टार्गेट करण्यात आलं.
भारताला तणाव वाढवायचा नाही. पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला. त्याचं उत्तर भारतीय सैन्याने काल आपल्या कारवाईने दिलं. टीआरएफचा उल्लेख करण्याला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. दहशतवादी कारवायांपासून पाकिस्तानचा हात झटकण्याचा प्रयत्न. जागतिक दहशतवादाचं केंद्र म्हणून पाकिस्तानविरोधात अनेक पुरावे’
संयुक्त राष्ट्रांनी द रेझिस्टंस फ्रंटचा उल्लेख केला होता. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं पाकच्या मंत्र्यांकडून मान्य. भारताने उरी, पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देऊन कारवाईची मागणी केली होती. आपण दिलेल्या पुराव्यांचा वापर पाककडून दहशतवाद्यांच्या बचावासाठी’
‘भारताने पाकिस्तानला आधीच इशारा दिला होता’ दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाक अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार. पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य केलं’ पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार. गेल्या ६ दशकांमध्ये पाकिस्तानने भारतावर अनेकदा युद्ध लादलं. पाकिस्तानने अनेकदा करारांचं उल्लंघन देखील केलंय. पाककडून भारतात १५ ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न. भारतीय वायुदलाने रात्री S-४०० एअर डिफेन्स सिस्टीम डागली पाककडून ड्रोन आणि मिसाईलने हल्ल्याचा प्रयत्न भारतावर कुठे कुठे हल्ल्याचा प्रयत्न अवंतीपुरा, पठाणकोट, जालंधर, भटिंडा, फालोदी, श्रीनगर, अमृतसर, लुधियाना, चंदीगड, उत्तरलाय, जम्मू, कपूरतला, आदमपूर, नाल.