“असेच जर राहणार असेल तर, रत्नागिरीत पुन्हा नाटकाचा प्रयोग करणार नाही” – भरत जाधव

“असेच जर राहणार असेल तर, रत्नागिरीत पुन्हा नाटकाचा प्रयोग करणार नाही” – भरत जाधव

शनिवारी २० मे रोजी रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात रात्री अभिनेता भरत जाधव यांचा ‘तू तू मी मी’ या नाटकाचा नाट्यप्रयाेग हाेता. नाटकाच्या प्रयाेगानंतर अभिनेता भरत जाधव यांनी नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टीमवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. नाट्यगृहातील दुरावस्थेबाबत बाेलताना नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा शाे करणार नाही, असे जाहीरच करून टाकले.

ते म्हणाले की, मेकअप रुम, व्यासपीठ आणि प्रेक्षक बसतात त्याठिकाणी एसी नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. ‘एससी नसल्याने काय होत हे आमच्या भूमिकेतून पाहा, अशी कळकळीची विनंती भरत यांनी प्रेक्षकांना केली. साऊंडचा तुम्हाला जसा त्रास हाेताे, तसाच ताे आम्हालाही हाेत आहे. मागे मी एक-दाेन प्रयाेग केले, त्यावेळी एसी आणि साऊंडचा प्राॅब्लेम हाेतेच. आपण याबाबत सांगितलेही हाेते. पण, काहीच झाले नाही. तुमची माफी मागताे, मात्र, यामध्ये काहीतरी बदल हाेणे आवश्यक आहे. नाहीतर चांगली चांगली नाटक आणताना खूप त्रास हाेताे, असे सांगून ‘रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही,’ असेही त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केले.

IPRoyal Pawns