सचिन चिटणीस, या चित्रपटाला मिळत आहेत साडेतीन स्टार
‘वेड’ लावणारे ‘वेड’
काही वेड्यासारखे प्रेम करतात, काही प्रेमातल वेड होतात.
रितेश देशमुखचे पहिले दिग्दर्शन, जेनेलिया देशमुखचे मराठीत पदार्पण, अजय-अतुलचे सुंदर संगीत, सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, सुंदर गाणी, कोणताही डोक्याला ताप न देता तरल चाललेला सिनेमा महाराजा अजून काय हवे चांगल्या चित्रपटासाठी
आणि म्हणूनच ‘वेड’ हा चांगला चित्रपट बनला आहे.
एक क्रिकेटवेडा तरुण सत्या ( रितेश देशमुख ), ज्याचं क्रिकेटवर व निशा ( जिया शंकर ) वर नितातं प्रेम आहे. निशा एका नेव्ही कुटुंबात वाढलेली मुलगी. निशाची सत्यासोबत एका गैसमजातुन तयार झालेली तेढ मैत्रीमध्ये रूपांतरित होते. प्रेमात सगळं काही सुरळीत सुरु असताना क्रिटेकमध्ये मात्र सत्याला तत्वाशी तडजोड करणं अवघड जातं, राग मत्सर आणि गैरसमज सत्याला एका अयोग्य मार्गावर घेऊन जातात. भास्कर अण्णा ( रविराज केंडे ) एकदा निशा सोबतच्या भेटीदरम्यान त्याच्या मूळ रंगावर येतो आणि सत्याला त्याची चूक कळते, जीव मुठीत घेऊन सत्या आणि निशा ती वेळ निभावून घेऊन जातात.
श्रावणी (नवीन मुलगी- सत्याची बायको ) सत्याच तिच्याशी लग्न होऊनही सत्याने तिला अजूनही बायकोचा दर्जा दिला नाही.
जवळपास एक दशक लोटलं पण दारूच्या नशेत बुडालेला सत्या अजूनही निशाच्या आठवणीत त्या खोलीत वारंवार येतोय, पण या विरुद्ध श्रावणी सत्यावर लहांपणापासूनच जीवापाड प्रेम करते. सत्याचं डगमगलेलं आयुष्य बघून त्याला सावरण्यासाठी घरच्यांचा विरोध असूनही स्वतः च आयुष्य पणाला लावते, आपण चुकतोय हि जाणीव सत्याला पुन्हा काही तरी करायला भाग पाडते पण त्याच्या याच प्रयत्ना दरम्यान त्याचा भूतकाळ पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात त्याच्या समोर येऊन उभा राहतो ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती, सत्या या सर्व आव्हानाला कसे समोर जातो, सत्या निशाला विसरेल का ? जीवनात आलेल्या श्रावणीला सत्या पत्नी म्हणून स्वीकारेल का ? सत्याचं पाहिलं प्रेम क्रिकेट त्याला पुन्हा मिळेल का ? ह्या सर्व गोष्टीची उत्तरं शोधणारा प्रवास म्हणजे ‘वेड’
वेड’ या मराठी चित्रपटातून जिनिलीया डिसुजा-देशमुख मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. तर, अभिनेता रितेश देशमुख याने दिग्दर्शक आणि अभिनेता या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या आहेत. अशोक सराफ यांचा अभिनय मस्तच.
वेड साठी वेडं होण्यास काहीच हरकत नाही.
सत्या (रितेश विलासराव देशमुख)
श्रावणी (जिनिलिया देशमुख)
निशा (जिया शंकर)
दिनकरराव (अशोक सराफ)
मुरली (विद्याधर जोशी)
जाँटी (शुभंकर तावडे)
भास्कर अण्णा (रविराज केंडे)
खुशी (खुशी हजारे)
कुमार (विनीत शर्मा)
गणेश (अविनाश खेडेकर)
कोच (विक्रम गायकवाड)