लांजा महाविद्यालयाच्यावतीने कै. नाना वंजारे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

लांजा महाविद्यालयाच्यावतीने कै. नाना वंजारे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

लांजा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील निबंध, वक्तृत्व व वादविवाद विभागाच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. सदाशिव सखाराम ऊर्फ नाना वंजारे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात दिनांक *१२ जानेवारी २०२३* रोजी घेण्यात येईल. वक्तृत्व स्पर्धेसाठी *’ नाते जुळावे मनाशी मनाचे! ‘* हा विषय आहे. वक्तृत्व स्पर्धा मराठी भाषेतून होईल. *वक्तृत्व कालावधी किमान ७ मिनिटे व एकूण १० मिनिटे* असा राहील. यामध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालये व विद्यापीठामध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी दिनांक १० जानेवारी २०२३ पर्यंत नोंदणी करायची आहे. नाव नोंदणीसाठी https://forms.gle/pTnBaEnnfpNdRS527 ही गुगल फॉर्म लिंक आहे. स्पर्धकांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य किंवा विभाग प्रमुख यांचे पत्र देणे अनिवार्य आहे.
*वक्तृत्व स्पर्धेसाठी पारितोषिके* पुढीलप्रमाणे : प्रथम पारितोषिक – रू. २०००, द्वितीय पारितोषिक – रू. १५००, तृतीय पारितोषिक – रू. १००० व उत्तेजनार्थ २ पारितोषिके – प्रत्येकी रू. ५००. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.
स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक डॉ. महेश बावधनकर यांच्याशी ९४२३८१७७११ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. काशिनाथ चव्हाण व निबंध, वक्तृत्व व वादविवाद विभाग प्रमुख डॉ. महेश बावधनकर यांनी केले आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns