“मला असे कोणीही माझ्या पदावरून काढू शकत नाही काही कायदे कानून आहेत की नाही” – शरद पोंक्षे
आजच्या विश्वस्तांच्या मीटिंगमध्ये हे माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलाच्या दुरुस्तीस प्रचंड खर्च येणार असल्याने त्या जागी नवीन अध्ययावत असे नाट्य संकुल बांधण्यात येणार असून लवकरच ते नियामक मंडळाच्या बैठकीत ठेवून त्यावर शिक्कामोर्तब होईल असे आश्वासन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.
ते पुढे म्हणाले “मला असे कोणीही माझ्या पदावरून काढू शकत नाही काही कायदे कानून आहेत की नाही असा सवालही शरद पोंक्षे यांनी या पत्रकार परिषदेत विचारला.
मी आजही परिषदेच्या कार्यालयामध्ये आहे आजही मी त्याच पदावर असून मी माझे काम उत्तमरीत्या पार पाडत आहे.
तहहयात विश्वस्त शरद पवार साहेबांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घातली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले ते म्हणाले असं तुम्हाला कसं कोण काढू शकत पवार साहेब आमच्या बाजूने उभे असून त्यांना पूर्ण माहिती आहे की ही लोकं चावटपणा करत आहेत.
आम्ही खूप चांगलं काम करत असताना सुद्धा विरोधाला विरोध करायचा हे विरोधकांनी ठरवूनच ठेवलं होतं. दहा तारखेला आम्ही निवडणूक जाहीर करू आमच्या कारभारात समजा गडबड घोटाळा असेल तर त्यांनी कागदोपत्री पुरावे सादर करावेत.
प्रसाद कांबळी – आमच्या विरुद्ध जे आहेत त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बदनामी केली आहे.
यशवंत नाट्य मंदिर पाडून त्याजागी अध्ययवत असे भव्य नाट्यसंकुल बांधावे असा प्रस्ताव १० डिसेंबरला नियामक मंडळाच्या सभेत ठेवण्यात येईल व तो पास होण्यास कोणतीच अडचण येणार नाही आणि या सभेस तहहयात अध्यक्ष शरद पवार व शशी प्रभू उपस्थित राहणार आहेत. आजचे यशवंत नाट्य संकुल हे दुरुस्त करावयास गेल्यास त्यास प्रचंड असा खर्च आहे त्यामुळे आम्ही तहहयात अध्यक्ष शरद पवार यांना नियमक मंडळाची मीटिंग घेऊन त्यात हा प्रस्ताव पास करून घ्यावा अशी विनंती केली आहे आणि त्यानी तसा त्यास दुजोरा सुद्धा दिला आहे. त्यामुळे 110% आजच्या यशवंत नाट्य मंदिराच्या जागेवर अध्ययवत असे यशवंत नाट्य मंदिर बनणार.
नाट्य परिषदेमध्ये जो काही राजकीय हस्तक्षेप झाला तो येणाऱ्या काळात रंगकर्मींना भोगावाच लागणार आहे.