नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात…
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्यसंमेलन पुढील वर्षी मार्च महिन्यात होणार असून २०२३ – २०२४ च्या शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलनानिमित्त विभागीय पातळीवर इतर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नियामक मंडळ व विश्वस्त मंडळाच्या आजच्या ( शुक्रवार ) संपन्न झालेल्या संयुक्त सभेत ठरवण्यात आले.
या सभेत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच चंद्रपूर व गडचिरोली परिसरात ‘झाडीपट्टी’ हा वैदर्भीय शैलीतील नाट्यप्रकाराने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. याचे लेखन व सादरीकरण यातील वैविध्यामुळे ते थोड्याच कालावधीत एक आकर्षण बनले आहे रंगभूमीला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या कलाप्रकाराचे महाराष्ट्राच्या इतर भागातही सादरीकरण व्हावे, अशी सूचना उदय सामंत यांनी नाट्य परिषदेसमोर केली.
सभेचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्तीचे काम हाती घेतले यासाठी सर्वोतोपरी मदत विश्वस्त मंडळ करेल.